पैठण, (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतीच्या आजूबाजूने जाणारा पैठण रहाटगाव जुना रस्त्या लगत असलेल्या शेती आणि रस्ता अतिवृष्टीच्या पाण्यामुळे शेतातील पिकासह जमीन वाहून गेली आहे.
अशीच अवस्था शेजारी असलेल्या शेतकऱ्यांची झाली असून ओदधातील पाण्यामुळे 4. नाथासणाररातून पाणी सोडल्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हैराण झाले आहेत. रहाटगाव ते पैठण जुना रस्त्यावर काही शेतकन्यानी अतिक्रमण केले असल्यामुळे रस्ता लहान झाला आहे.
तहसील प्रशासनाने ताबडतोब रस्त्यावरील अतिक्रमण काढून नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली.
सद्यस्थितीत ओढधात पाणी असल्यामुळे शेतकऱ्याचे जाणे येणे थांबले असून ते त्रस्त झाले आहेत. पोटे, महाजन, खेडकर, बडेकर, गारदे, झांजे, कामाटी, अवधूत, ठानमें, गव्हाणे, सारीक, चाटुपळे, वाव्हळ, सव्वाशे, मानमोडे, नाईक, पोकळे आदी शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाने येने मुश्किल झाले असून प्रचंड नुकसान झाले आहे. यावर तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे.